मालवण जेटी ते दांडेश्वर मंदिर- मोरेश्वर देवालय पर्यंत बंधारा कम रस्ता व्हावा-मेघनाद धुरी

मालवण-दि.२० ऑक्टोबर 

मालवणच्या किनारपट्टीवर मालवण बंदर जेट्टी ते दांडेश्वर मंदिर व श्री देव मोरेश्वर देवालय पर्यंत रस्ता कम बंधारा होणे गरजेचे आहे. याबाबत सर्व्हे करून बंधाऱ्याचे इस्टीमेट करण्याचे आदेश पतन अभियंता, पतन विभाग सिंधुदुर्ग यांना देण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाळ्यात समुद्री लाटांमुळे किनाऱ्याची मोठी धुप होत असते तसेच मालवणच्या समुद्र किनारी मच्छिमारांची घरे असल्यामुळे या घरांना धोका संभवत असून मच्छिच्या वाहतुकीसाठी रस्ता नसल्याने बंधारा कम रस्ता होणे गरजेचे आहे. तरी मालवण बंदर जेट्टी (धक्का) ते दांडेश्वर मंदिर व श्री देव दांडेश्वर मंदिर ते श्री देव मोरेश्वर देवालय (टीकम शाळेकडून आलेल्या रस्त्यापर्यंत) पर्यंत रस्ता कम बंधारा बांधण्यात यावा. या अंतरामध्ये श्री दांडेश्वर मंदिर परिसरात सुमारे २०० मीटर चा रस्ता कम बंधारा झालेला आहे. त्यावर जो रस्ता केलेला आहे, त्या रस्त्यावरुन दोन गाड्या जात नाही. तो अरुंद आहे. त्यामुळे यापुढे होणाऱ्या रस्ता कम बंधारामध्ये दोन गाड्या सहज गेल्या पाहीजे एवढ्या रुंदीचा असावा. या कामाचा सर्व्हे करुन इस्टीमेंट करण्याचे आदेश पतन अभियंता, पतन विभाग, सिंधुदुर्गनगरी, ओरोस यांना देण्यात यावे अशी मागणी मेघनाद धुरी यांनी मंत्री ना. चव्हाण यांच्याकडे केली आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा