नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक महिलेला 8 लाखांचा गंडा

फसवणूक झाल्याबाबत पंतनगर घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी यांनी कौशल्याने तपास करून आरोपींच्या मुसक्या दिल्लीत आवळल्या

मुंबई-दि.३० ऑक्टोंबर किशोर गावडे

लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्याने अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत.नोकरीच्या शोधात अनेकांनी क्विक जॉबसारखे अप्लिकेशन किंवा जॉब मिळवून देणाऱ्या ज्या ऑनलाईन कंपनी आहेत त्या कंपनीकडे नोकरीसाठी अप्लाय केलं आहे. अनेक तरुण-तरुणींनी सुद्धा अशाच प्रकारे काही कंपन्याकडे नोकरी साठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
पंतनगर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, www.shine .com वर वैशाली सचिन मेहता यांनी क्विक जॉब या शाईन डॉट कॉम अप्लिकेशनवर नोकरीसाठी अप्लिकेशन केलं होतं. त्यानंतर त्यांना कंपनीकडून विराज नामक व्यक्तीचा फोन आला. फिर्यादी वैशाली मेहता यांनी www.shine.com या साइटवर आपला नोकरीसाठी अर्ज अपलोड केला होता. शाईन डॉट कॉम मधून विराज बोलतोय असे सांगून त्यांनी वैशाली यांच्याशी सातत्याने संपर्क साधला.
वैशालीने नोकरीसाठी तातडीने पैसे भरले आणि त्यांना एक ऑनलाईन लिंक पाठवली गेली. त्या लिंकमध्ये सर्व माहिती भरत असतानाच त्यांच्या खात्यातून तब्बल 8 लाख 16,हजार 596 रुपये काढण्यात आल्याचे कळले.

सुरुवातीला कंपनीच्या नियमानुसार आपल्या बँक खात्यात नाममात्र 10 रुपये डेबिट होतील असे सांगितले गेले. बँक खाते, डेबिट कार्ड, ओटीपी क्रमांक, मिळाल्यानंतर 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत आलेल्या ओटीपी क्रमांकानुसार विराजने मागणी केल्याप्रमाणे वैशाली यांच्या बँक खात्यातून 8 लाख 16 हजार 596 रूपये परस्पर डेबिट झाल्याचे लक्षात आले. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला गेला नाही. असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 7/09/2020 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 562/2020, भांदवि,419,420,सह 66 क, 66 ड अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

घाटकोपरच्या सुधा पार्क मध्ये रहाणाऱ्या
वैशाली सचिन मेहता यांची
8 लाख 16,596 रुपयांची फसवणूक झाल्याबाबत घाटकोपर पंतनगर पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले गेले होते. पंतनगर पोलिसांसमोर कौशल्याने तपास करण्याचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी दिले होते.आणी घटनेचा तपास अधिकारी म्हणून एपीआय अमोल माळी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती.

कर्तव्यदक्ष पोलिसांनी सर्वप्रथम गुन्हायात वापरलेले मोबाईल क्रमांक, व पेटिएम वाॅलेटची तपासणी केल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे प्राप्त केली. वपोनि पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारी, सपोनि अमोल माळी यांच्यावर सोपवली होती. सपोनि बाबासाहेब पिसाळ , जाधव, सांगळे, पोमणे, यांनी वरिष्ठांच्या परवानगीने दिल्ली गाठली.

दिल्लीत जाऊन सर्वप्रथम बोगस कॉल सेंटरवर धाड टाकली .व 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतले व तिथून उत्तर प्रदेश मधील बागपत मध्ये जाऊन आणखी एकाच्या मुसक्या आवळण्यात अमोल माळी यांना यश मिळाल्याचे वपोनि सुहास कांबळे यांनी सांगितले.

सदर गुन्ह्यात,आसिफ मोहम्मद जरूल हसन (27) राहुल तीलक्रराज (21), रवी भानुप्रताप मोकला ( 24), देवेश कुमार वीरपाल सिंह (23) आदित्य करण सिंग (32) हा शिक्षक व मनी ट्रान्सफर आहे. संबंधित आरोपीकडून
8 हार्ड डिस्क, 23 मोबाईल,47 सिम कार्ड, बारा डेबिट कार्ड 12 डेबिट कार्ड, 11 पेटीएम कार्ड, 7 डोगंळ, 4सीडी, 2 पॅन कार्ड, एकाचा वाहन चालक परवाना, तसेच 52 सिम कार्ड चे केस
कव्हर, एक मोबाईल बॅटरी, व रोख रक्कम 1 लाख 74 हजार रुपये हस्तगत करण्यात आले.

P

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा