रत्नागिरी कुणकेश्वर वस्तीची प्रवासी फेरी 12 नोव्हेंबर पासून सुरू

देवगड-दि.१० नोव्हेंबर

दिवाळी सणाचा हंगाम लक्षात घेता रापम रत्नागिरी विभागीय कार्यालय मार्फत रत्नागिरी आगाराची रत्नागिरी ,पावस, नाटे,जैतापूर डोंगर तिठा मार्गे कात्रादेवी आंबेरी पडेल मार्गे देवगड कुणकेश्वर ही वस्तीची प्रवासी फेरी 12 नोव्हेंबर पासून सूर करण्यात येत आहे.ही प्रवासी फेरी दुपारी 3 वाजता रत्नागिरी येथून मार्गस्थ होणार आहे व सायं.7.10 वाजता कुणकेश्वर येथे पोहचेल.व दुसरे दिवशी सकाळी 7 वाजता कुणकेश्वर येथून मार्गस्थ होऊन देवगड पडेल कात्रादेवी डोंगर तिठा मार्गे जैतापूर ,नाटे, पावस रत्नागिरी अशी सकाळी 11.15 पर्यंत पोहचेल.या प्रवासी फेरीचा प्रवाशांनी फायदा घ्यावा असे आवाहन रत्नागिरी रापम विभागामार्फत करण्यात आले आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा