बाळासाहेब ठाकरे – व्यंगचित्रकार ते हिंदूहृदयसम्राटपर्यंतचा प्रवास

ब्युरो न्युज-दि. १७ नोव्हेंबर

बाळासाहेब ठाकरे – या व्यंगचित्रकाराचा हिंदुहृदयसम्राटापर्यंतचा प्रवास थक्क करणारा होता. मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरत त्यांनी देशाच्या राजकारणात स्वतःची व महाराष्ट्राची वेगळी ओळख, जागा निर्माण केली. बाळासाहेबांच्या ठाकरे शैलीचा ‘सामना’ करण्यास कोणीच धजावत नसे. त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्यांच्या एका आदेशावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणत हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरायचे. त्यापलीकडे जाऊन कलावंतांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारे कलाकार, प्रख्यात व्यंगचित्रकार, व सामान्य माणसाला राजकारणात मंत्रीपदापर्यंत घेऊन जाणारा अवलिया अशी बाळासाहेब ठाकरे यांची अनेक रूपे पाहावयास मिळाली. गल्लीतून आंदोलनांना सुरुवात करून दिल्लीला आपली दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाहूया त्यांची काही खास दुर्मिळ छायाचित्रे –

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा