आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला

0
310

 जीवरक्षक अक्षय वाडेकर याने दिले जीवदान

आचरा-दि.२१ नोव्हेंबर

आचरा समुद्रात शनिवारी सायंकाळी 2 पर्यटक समुद्रात अंघोळीसाठी उतरले होते समुद्रात आंघोळ करत असताना पाण्यात काही अंतरावर गेल्यावर त्यातील एक पर्यटक बुडू लागला आचरा किनाऱ्यावर आचरा ग्रामपंचायत मार्फत तैनात असलेल्या जीवरक्षकाने समुद्रात झेप घेत समुद्रात बुडत असलेल्या पर्यटकास जीवदान दिले आहे
लाॅकडाउन शिथिल झाल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर
गेल्या 4 दिवस आचरा समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत.त्यामुळे समुद्र किनारी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अशातच काही पर्यटक अंघोळीसाठी समुद्रात उतरत आहेत. शनिवारी सायंकाळी किनाऱ्या लगत असलेल्या रिसॉर्ट मधील पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत किनाऱ्यावर दाखल झाले होते त्यातील 2 पुरुष सदस्य समुद्रात अंघोळीचा आनंद लुटण्यासाठी उतरले होते. त्यातील सागर शंकर बेलेकर वय 34 रा. कोल्हापूर कागल हा तरुण खोल पाण्यात गेल्यामुळे बुडू लागला त्याच्या समवेत असलेला त्याचा साथीदार पोहता येत असल्याने किनारा गाठू शकला. तरुण बुडत असल्याचे किनाऱ्यावर असलेला जीवरक्षक अक्षय वाडेकर याने पाहिले असता त्याने धाव घेत पोहत बुडणाऱ्या पर्यटकास गाठत त्याला किनाऱ्यावर आणले. अक्षय वाडेकरच्या तत्परतेने आज एका पर्यटकास जीवदान मिळाले आहे. जीवरक्षक अक्षय वाडेकरने दाखवलेल्या धाडसा बद्दल आचरा सरपंच प्रणया टेमकर व उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी कौतुक केले.

 

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा