राष्ट्रपिता महात्मा गांधी विचारधारा

राज्यस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर

देवगड-दि.२१ नोव्हेंबर 

आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच राज्यस्तरीय समुहाच्या प्रमुख व मुख्य प्रशासिका वृषाली सुरेश खाड्ये(मुंबई) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या विचारांची, तत्वांची ओळख व्हावी यासाठी सर्व भाषिक माध्यमांतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महात्मा गांधी विचारधारा स्पर्धा’ आयोजित केली होती. या स्पर्धेचे वैशिष्टय म्हणजे विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींजीचे विचार हे भाषण, काव्य, गोष्टी, प्रसंग इ.द्वारे व्यक्त करतांना व्हिडीओ शुट करून आयोजकांकडे गुगल फॉर्मद्वारे पाठवायचे होते. विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून महात्मा गांधींजीचे विचार भाषण,काव्य,गोष्टी,प्रसंग मांडण्याचा सुंदर प्रयत्न केला. या स्पर्धेला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांचे व्हिडिओ ‘साहित्यमंच’ या यु ट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येऊन व्हिडीओच्या views व लाईक्स वरुन क्रमांक काढून गौरवण्यात आले.

ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रकाश पुना चऱ्हाटे, (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मुंबई विभाग समन्वयक, व समुहाचे मुख्य सल्लागार), प्रमुख अतिथी डॉ. संगीता महेंद्र चौहान (उपाध्यक्ष अखिल भारतीय महिला सक्षमीकरण संस्था) यांच्या हस्ते बालदिनाचे औचित्य साधून शनिवार दि.१४नोव्हेंबर २०२० रोजी ई-व्यासपीठ म्हणून सोशल मिडीयावरील समुहांवर ऑनलाईन बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

या ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री.प्रकाश चऱ्हाटे साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात या वैशिष्ट्य पूर्ण ऑनलाईन उपक्रमाचे कौतुक करुन कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी आम्ही तंत्रस्नेही समुहाच्या या अभ्यास पुरक उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व प्रायोजक डॉ. संगीता चौहान यांनी आपल्या मनोगतात पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबदल समाधान व्यक्त केले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक रिहान रियाज इनामदार (नेहरूनगर म.न.पा.उ.प्रा.इंग्रजी शाळा,कुर्ला मुंबई), द्वितीय क्रमांक मानसी सचिन सौदागर (शिवाजी विद्यालय, काजूपाडा, कुर्ला मुंबई), तृतीय क्रमांक ईशा शशिकांत गुरव (महाराणी सईबाई विद्यामंदिर सईबाई नगर, मालाड पूर्व मुंबई), तर उत्तेजनार्थ म्हणून रूद्राक्ष अतुल मादावार (श्री.शिवाजी विद्यालय,मुळावा उमरखेड, यवतमाळ) व मानसी योगेश सुर्यवंशी (जिजामाता गर्ल्स हायस्कूल,सटाणा बागलाण, नाशिक) यांना संदीप मधुकर सोनार (जळगाव) यांनी तयार केलेली ई-प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच त्यांच्या बक्षीसाची रक्कम पालकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही ई-प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय सुनील द्रविड (कोल्हापूर) व सुनिता पांडुरंग अनभुले (मुंबई) यांनी करून दिला.तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप यशवंत जाने (जळगाव) यांनीे केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचे ऑनलाईन सूत्रसंचालन वर्षा प्रमोद चोपदार (मुंबई) यांनी तर आभार प्रदर्शन अंजली अभयसिंह ठाकुर (यवतमाळ) यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजेश चायंदे (अमरावती), साईली संदेश राणे (मुंबई), स्वरूप अनाजी सावंत (मुंबई) व सर्व टिमने परिश्रम घेतले.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा