स्व. सुनिल तळेकर यांच्या २३ व्या स्मृती दिनानिमीत्त

२५ नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन

तळेरे-दि.२१ नोव्हेंबर संजय खानविलकर

तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर यांच्या २३ व्या स्मृती दिनानिमीत्त २५ नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात हे शिबिर सकाळी 9.30 वा. पासून सुरु होणार आहे.

स्व. सुनिल तळेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय व विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी
महाविद्यालय, तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा रक्तपेढी, जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे.

या शिबिराला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती रविंद्र जठार, कणकवली प.स. सभापती दिलीप तळेकर आणि तळेरे येथील प्रथितयश डॉ. मिलिंद कुलकर्णी असणार आहेत.या रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा