वाहतूक पोलीसांनी ६३ वाहनधारकांना दंड ठोठावला

वाहनधारकांकडून १३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल

सावंतवाडी-दि.२१ नोव्हेंबर

सावंतवाडी शहरात आज वाहतूक पोलीसांनी ६३ वाहन धारकांना दंड ठोठावला आहे.या वाहनधारकांकडून १३ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.आज दि.२० नोव्हेंबर रोजी मा.पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आणि  अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा दिपक दळवी, आबा पिंरणकर, भोगले यांनी कारवाई केली.

सावंतवाडी शहरात ठिक ठिकाणी वाहनधारकांवर कारवाईची मोहीम राबविली. गाडी चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, लायसन नसताना गाडी चालविणे, गाडीवर काळी काच लावणे , गाडीला आरसा नाही ,अशा ६३ वाहनधारकां विरुध्द कारवाई करून १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा