कर्जबाजारीपणामुळे सराफाची गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न

0
133

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव

ब्युरो न्युज-दि. १६ डिसेंबर

वाढत्या कर्जाच्या बोझ्याला कंटाळून पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक मिलिंद उर्फ बळवंत मराठे (वय 60) यांनी छातीत गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिलिंद मराठे हे प्रसिद्ध व्यवसायिक असून लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे मराठे ज्वेलर्स दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी ते दुकानात असताना त्यांच्या दुकानातून अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यानंतर आवाज ऐकून दुकानातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता मराठे यांच्या छातीत गोळी लागली असल्याचे निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आर्थिक अडचणीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे मराठे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे यांनी दिली.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा