पोक्सो अंतर्गत 30 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल

0
2007

आरोपीला घेतले पोलिसांनी ताब्यात

देवगड-दि. २५ डिसेंबर

तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय युवकाने सुमारे 8 वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर अतिप्रसंग करून लैंगिक शोषण केल्याची फिर्याद देवगड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. सदरची घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील संशयित आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचे वृत्त समजताच अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. देवगड पोलीस स्थानकाचे सहा. पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी आरोपीला ताब्यात घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक गीतांजली जगताप अधिक तपास करीत आहेत.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा