सर्वाधिक लांबीच्या देवगड झिपलाईनचे 26 डिसेंबर रोजी

0
185

आम.नितेश राणे यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा 

देवगड-दि.२५ डिसेंबर

भारतातील समुद्र किनाऱ्यावरील पहिली आणि महाराष्ट्र मधील सर्वाधिक लांबीची देवगड झिपलाईन उदघाटन सोहळा शनिवार दि 26 डिसेंबर रोजी साय.4 वाजता आम.नितेश राणे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देवगड पवनचक्की या ठिकाणी संपन्न होणार आहे.ही झिपलाईन 1885 फुट लांब,280 फुट एवढ्या लांबीची व उंचीची आहे.तरी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संचालकांनी केले आहे.तसेच कोरोना संक्रमण काळात बंद ठेवण्यात आलेले सेलिब्रेटीज वॅक्स म्युझिअम 26 डिसेंबर पासून नागरिक, पर्यटक याना पहाण्यासाठी खुले होणार आहे.अशी माहिती वॅक्स म्युझिअम व्यवस्थापिका तन्वी चांदोस्कर यांनी दिली .

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा