नांदगावात ग्रामपंचायतवर पाण्यासाठी उद्या घागर मोर्चा…

कणकवली-दि. ३१ जानेवारी (भगवान लोके)

नांदगाव गावातील आठ वाडयांची असलेली जलस्वराज्य नळपाणी योजना ही नांदगाव वाशिनवाडी, नांदगाव तिठा, खालची मुस्लीमवाडी, सिसयेवाडी, बिडयेवाडी, मोरयेवाडी, पाटीलवाडी, पावाचीवाडी अशा वाडयांसाठी नांदगाव ग्रा. पं. मार्फत नळपाणी योजना राबवित आहे. मात्र कित्येक दिवस पाहीले असता अनियमीत पाणी पुरवठा होत असल्याने आम्ही नळ ग्राहक हैराण झालो आहोत. यामुळे येत्या पाच दिवसांत नळपाणी सुरळीत न केल्यास ग्रापंचायतवर घागर मोर्चा काढणार असल्याचा इशारा नळ ग्राहकांनी नांदगाव ग्रा. पं. ला दिला होता. मात्र याबाबत काहीही कार्यवाही न झाल्याने १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. नळ ग्राहकांचा घागर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबद्दल शिष्टमंडळाने नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले होते.

निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की पाणी या प्रश्नाकडे कोणी गांर्भीर्याने कोणी बघतच नाही बिले मात्र अगत्य काढायची पाणी केव्हा कीती जाते हे कधी पाहयचे नाही. बाकीच्या गावांनी सोमवारी सुध्दा पाणी येत आहे आणि आपल्याकडे दरदिवशी पाणी देण्यास काय हरकत आहे ? प्रत्येक माणसाला नियमाने दरदिवशी पाणी मिळणे शासनाच्या नियमाप्रमाणे अपेक्षीत असून देखीलही आपल्या बाबतीत असे का ? गेली दोन वर्ष पाण्याचा प्रश्न सुटत नाही लाखो रूपये खर्च करूनही पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही याबाबत लेखी उत्तर अपेक्षीत असून पाणी सुरळीत दरदिवशी न आल्यास ग्रा. पं. कार्यालयावर आज सोमवार दिनांक १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १०.३० वा. नळ ग्राहकांचा घागर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा