एअर फोर्स असोशिएशनच्या मुंबई शाखेचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई-दि.१४
एअर फोर्स असोशिएशनच्या मुंबई शाखेचे उदघाटन
एअर फोर्स असोशिएशन (महाराष्ट्र ) चे अध्यक्ष ग्रुप कॅप्टन सुहास फाटक (निवृत्त) यांच्या हस्ते मुंबई शाखेचे उपाध्यक्ष डॉ. अर्जुन मुरुडकर , सह सचिव ॲड. मधुकर वाजंत्री तसेच नागपूर शाखेचे उपाध्यक्ष मनोहर भातकुलकर मुख्य अतिथी भाऊराव सारस्वत ,वासुदेव सराफ , सदस्य प्रशांत भगत, दत्ताराम नाईक, रमाकांत सारंगधर आदी प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शनि दि 13 रोजी रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, उलवे , नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.या समारंभास एअरफोर्सचे माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यात राहणाऱ्या एअर फोर्स या हवाई दलाच्या जवानांच्या गरजा व आकांक्षांची पूर्तता करणार आहे .एअर फोर्स असोशिएशन, मुंबई शाखेचे कार्यालय सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथे असून मुंबई, मुंबई उपनगर,पालघर ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एअर फोर्स मधून निवृत्त झालेल्या एअर व्हेटरन्स यांना लाभ होणार आहे.
एअरफोर्स असोसिएशनची स्थापना नवी दिल्ली येथे १ सप्टेंबर १९८० रोजी भारत सरकारचे सचिव आणि मुख्य सल्लागार यांच्या मंजूरीने एक अराजकीय संस्था म्हणून केली गेली होती .सदर संस्थेच्या आतापर्यंत 20 शाखा असून त्याचे 66000 पेक्षा अधिक सभासद कार्यरत आहेत .या संस्थेच्या १८ शाखा भारतातील विविध राज्यात असून प्रत्येकी एक शाखा ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील आहे.
सैन्यातील व्यस्त व सक्रिय आयुष्यानंतर, जेव्हा भारतीय हवाई दलातून एअर वॉरियर्स सेवा निवृत्त होऊन एअर व्हेटरन्स बनतात तेव्हा त्यांच्यावर नागरी जीवनात स्थावर होऊन कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना वेळोवेळी सरकार आणि इतर एजन्सीद्वारे देण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांबद्धल माहिती घेऊन त्यांचा लाभ घेणे अवघड
होऊन बसते. सेवानिवृत्त एअर फोर्सच्या कर्मचाऱ्यांना चांगली फेलोशिप आणि मदतीचा हात देण्याची कल्पना – मग तो कोणत्याही पदा चा असो – जन्माला आली ती एअर फोर्स असोसिएशन च्या रूपाने एअर फोर्स असोसिएशन चे अध्यक्ष म्हणून शेवटचे निवृत्त हवाईदल प्रमुख (चीफ ऑफ द एअर स्टाफ) यांची नियुक्ती होत असते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा