देवगड किल्ला येथील ऐतिहासिक शिवकालीन श्री गणपती मंदिराचे नूतन वास्तू चे उदघाटन न्यासाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते

0
162

 

देवगड- दि.१५ फेब्रुवारी
देवगड किल्ला येथील ऐतिहासिक शिवकालीन श्री गणपती मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास गेले .या मंदिराचे नूतन वास्तू चे उदघाटन फित कापून व श्रीफळ श्री गणेश मंदिर न्यासाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते न्यासाचे विश्वस्त तसेच देवगड किल्ला ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी सदस्य यांच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी नगरसेवक विकास कोयडे,निवृत्ती तारी ,राहुल गोगटे, श्री नेने व अन्य मान्यवर उपस्थित होते.ढोल ताशे व फटाक्यांच्या आतषबाजीत श्री चे पूजन व अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडले.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा