योगाभ्यास योग्य गुरु कडून शिकून तो नियमित पण करणे ही काळाची गरज

सावंतवाडी,दि.२३ फेब्रुवारी

शारीरिक उर्जेसाठी सुर्य-नमस्कार तर निरोगी जीवना साठी योगाभ्यास योग्य गुरु कडून शिकून तो नियमित पण करणे ही काळाची गरज आहे. रोटरी क्लब, सावंतवाडी यानी “जागतिक सुर्य-नमस्कार दिना” निमित्य आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारत स्वाभिमान, पतंजलि योग समिती, किसान सेवा समिती, युवा भारत समिती यांचे पदाधिकारी, सदस्य, योग शिक्षक, सहयोगी शिक्षक सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना योग तज्ञ श्री.विद्याधर पाटणकर यानी सुर्य नमस्कार हे आपल्याला दिवसभर लागणाऱ्या उर्जे साठी तसेच आत्मशक्ती केंद्रित करण्यासाठी सुर्य-नमस्काराची नित्य गरज आहे. अष्टांग-योगात यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्यहार, धारणा, ध्यान आणि समाधी सांगितलेली आहे. परंतु सामान्याना यम,नियम आणि आसन हे पाळणे कठीण होते म्हणून आपण प्राणायामा कडे वळतो असे ते म्हणाले. त्यानी स्वतः सुर्य-नमस्कार करुन दाखविले आणि जमलेल्या साधका कडून ते करुन घेतले.
प्रा.सुभाष गोवेकर यानी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. रोटरी अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी उपस्थितांचे स्वागत केले. आणि श्री.विद्याधर पाटणकर यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला.
योग शिक्षक श्री.विकास गोवेकर यानी आसन प्रकार समजावून सांगितले. तर श्री.दत्तात्रय सडेकर यानी जलनितीचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. रोटरी क्लबचे सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी महेश मो. भाट जिल्हा प्रभारी- भारत स्वाभिमान,प्रा. सुभाष गो. गोवेकर: जिल्हा प्रभारी- किसान सेवा समिती, सावंतवाडी. श्री. रावजी परब, श्री.दिलीप भाईप, नुतन रो.विनया बाड, रो.साईप्रसाद हवालदार, रो.वसंत करंदीकर, सौ.मनिषा नवांगुळ आणि यशराज हॉस्पिटलचा सर्व स्टाप उपस्थित होता.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा