एस.पि.के कॉलेज,समोरील पोलीस चौकी पुन्हा सुरु करावी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसची सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे मागणी

सावंतवाडी,दि.२३ फेब्रुवारी

श्री. पंचम खेमराज महाविद्यालय,सावंतवाडी समोर पूर्वी पोलीस चौकी होती त्यामुळे कॉलेज मधील विद्यार्थ्यांवर आपण कॉलेज बाहेर बेजबाबदार वागल्यास,मुलींशी छेडछाड केल्यास कारवाई होईल याची भीती होती.परंतु सदरची पोलीस चौकी बंद करण्यात आल्यामुळे सदर ठिकाणी मुलींची छेड काढणे,बाईक रेस लावणे,मारामाऱ्या करणे,गुंडगिरी वगैरे प्रकार घडत आहेत.त्यामुळे कॉलेज परिसरातील शांतता भंग होऊन,गंभीर प्रकार घडणायची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सदर ठिकाणी पूर्ववत पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सावंतवाडी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात मा.पो.उपनिरीक्षक श्री.बाबर यांच्याकडे करण्यात आली.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरअध्यक्ष अभिजीत पवार,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाअध्यक्ष राजू धारपवार,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सदस्य अर्षद बेग,सदस्य परेश तांबोस्कर,इम्रान शेख, प्रतीक सावंत,शेलटन नरोना,दीपक पाटकर,सोहेल शेख व शहरातील युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा