अणाव येथील आनंदाश्रय सेवाश्रमास पटकीदेवी मित्रमंडळाकडून अन्नधान्याची मदत…

0
207

कणकवली दि. २३ फेब्रुवारी 
कुडाळ तालुक्यातील अणाव येथील जीवन संजीवन सेवा ट्रस्ट आनंदाश्रय सेवाश्रमास पटकीदेवी कला क्रिडा मंडळ कणकवली यांच्यावतीने अन्नधान्याची मदत करण्यात आली आहे. क्रिकेट स्पर्धेतील शिल्लक राहिलेल्या रक्कमेतून सामाजिक बांधिलकी जोपासत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संस्था अध्यक्ष बबन परब यांच्याकडे ही मदत सुपुर्त केली.

यावेळी पटकीदेवी कलाक्रीडा मित्रमंडळाचे हृतिक नलावडे, चिन्मय माणगांवकर, चिन्मय मुसळे, बाळू उबाळे, दिनेश हुमरसकर, हर्षल बेळेकर आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा