ईश्वर हलगरे यांच्या ‘आरसा’ कादंबरीचे कवी अजय कांडर यांच्या हस्ते १३ रोजी प्रकाशन

कणकवली दि.५ मार्च
कोकणातील कवी-लेखक ईश्वर हलगरे यांनी लिहिलेल्या आणि अक्षर वाड:मय प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘आरसा’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवार 23 मार्च रोजी सायं. 7 वा. आयोजित करण्यात आला आहे. परभणी येथील साहित्य अकादमी विजेते लेखक आसाराम लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन होणाऱ्या या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या हस्ते सदर कादंबरीचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती अक्षर वाड:मय प्रकाशनाचे संचालक बाळासाहेब धोंडगे यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद विद्यापीठ मराठी विभागाचे प्राध्यापक तथा समीक्षक कैलास अंभुरे, नांदेड येथील प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ. विश्वधार देशमुख आदींना निमंत्रित करण्यात आले आहे.
मुळात कवी असलेल्या ईश्वर हलगरे यांची ‘आरसा’ ही पहिलीच कादंबरी डान्सबारच विश्व आपल्यासमोर आणतानाच स्त्री देहाच्या बाजारी करणालाच आक्षेप नोंदवते. एक लेखक म्हणून हे त्यांच्यातलं माणूसपण या कादंबरीच्या पानोपानी झिरपत गेलेलं आपल्याला पाहावयास मिळत. डान्सबार अनुषंगाने येणारे ‘दुसरे जग’ही या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे ही कादंबरी फक्त डान्सबार विश्वापूर्ती मर्यादित राहत नाही तर समाजाचं सहज न पाहता येणार विद्रूप रूपही समोर आणते, आणि एकरेषीय जगणार्‍या माणसाच्या नीतिमत्तेलाच धक्का देते. अखेर समाजाचा अमानवी चेहराच लेखक कलावंताला समोर आणायचा असतो.त्यात हा लेखक यशस्वी होतो. हेच या कादंबरीचं महत्त्वाचं यश आहे! असे मत या कादंबरीचा काही भाग नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाल्यावर मान्यवरांनी व्यक्त केले आहे.

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा