युथ फोरम राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेला आमदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट
देवगड,दि.२९ ऑक्टोबर
युथ फोरमच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा व अन्य उपक्रमातून युवकांना सहभागी करून कार्य करणे ही बाब कौतुकास्पद असून राजकीय व्यक्तींकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांच्या पेक्षाही युवकांच्या माध्यमातून राबविलेले उपक्रम हे सर्वाधिक महत्त्वाचे असतात आणि अशाच उपक्रमांमधून खऱ्या अर्थाने युवकांकडून समाजातील बांधिलकी जपली जात आहे.
लुप्त पावत असलेल्या रांगोळी सारख्या उपक्रमातून एक चांगला संदेश जात असताना राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही बाब युथ फोरम च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजासमोर जात आहे, याच तरुणांना युवकांना शिवसेनेचे वेड युवकांना लावले तेच युवक खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या धनुष्य बाणाकडे आकर्षित होतील व त्यांना योग्य दिशा मिळेलअसे सांगून आजही युवा पिढीतील तरुणांना शिवसेनेच्या धनुष्यबाण चे वेड असून धनुष्यबाण हातात घेऊन या युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही आम.डॉ. निलेश राणे यांनी देवगड येथे बोलताना केले
देवगड येथे आयोजित केलेल्या युथ फोरम राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा सदिच्छाभेटी प्रसंगी ते बोलत होते. आमदार झाल्यानंतर प्रथमच रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून देवगड मध्ये आलेले आमदार डॉक्टर निलेश राणे यांचे युवा वर्गातून उस्फुर्त स्वागत करण्यात आले. युथ फोरमच्या माध्यमातून त्यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात व्यासपीठावर शिवसेना उपनेते संजय आंग्रे, देवगड जामसंडेच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू, संदेश सावंत पटेल, तालुकाप्रमुख विलास साळसकर अमोल लोके, युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर, युवा सेनेचे तालुकाप्रमुख दिनेश गावकर,भाजप शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान ओंकार सारंग, संयम सोमण सागर गावकर, आणि प्रणव नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला .युथ फोरम चे अध्यक्ष ऍड सिद्धेश माणगावकर यांनी रांगोळी ची परंपरा जोपासत असताना राज्यभरातून रांगोळी कलाकार या स्पर्धेत सहभागी होतात याबरोबरच युथ फोरम च्या माध्यमातून नाट्य महोत्सव पक्षी प्राणी यांच्यासाठी दाना पाणी यासारखे अन्य उपक्रम देखील या युवकांनी स्थापन केलेल्या युथ फोरमच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याची माहिती आपल्या प्रस्ताविकास दिली.
उपनेते संजय आंग्रे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळणारे आमदार असून कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी देवगड येथे उपस्थित असून कामाचे पूर्ण नियोजन करून काम पूर्ण करीत असताना या जिल्ह्यातील आकारीपड जमीन,भूमिगत विद्युत वाहिनी व अन्य उपक्रमांना देखील आमदार डॉ. निलेश राणे यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम मार्गी लावले.असे सांगितले
सोहळ्याचे सूत्रसंचालन, स्वागत आभार ऋत्विक धुरी यांनी मानले.



