कणकवलीचा संघर्ष हा सर्वांच्याच पाचवीला पुजलेला – मंत्री उदय सामंत

शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा : शिंदे शिवसेनेचा कणकवलीत मेळावा

कणकवली दि.३० ऑक्टोंबर

प्रत्येक जिल्ह््यात निलेश राणेंसारखा एक आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यास विकासाची स्वप्न पुर्ण होतील. जिल्ह््यात खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागा. कणकवलीची २००५ सालातील पोट निवडणुक सर्वांना आजही लक्षात आहे. त्यावेळी आलेल्या शिवसेना नेत्यांना कोणीही पाणी सुद्धा दिले नाही. एवढे प्रेम महाराष्टÑाला या निवडणुकीने दाखवुन दिले. कणकवलीचा संघर्ष हा सर्वांच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना उभारण्यासाठी कामाला लागा. कणकवलीतील कार्यकर्त्यांची मला सहनशिलता माहीती आहे. त्यामुळे या मतदार संघात सहा ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य, वैभववाडी, देवगड नगरपंचायत या देवगडच्या होत्या. फक्त आणि फक्त शिवसेनेचा भगवा फडविण्यासाठी काम सुरु करा, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले.
कणकवली येथे शिंदे शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आ. निलेश राणे, माजी आ. राजन तेली, उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख संजय परब, उपजिल्हाप्रमुख संदेश पटेल, हरेष पाटील, तालुकाप्रमुख दामोदर सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. निलेश राणे म्हणाले, ज्या कणकवलीने महाराष्टÑाला मुख्यमंत्री दिला. त्या कणकवलीचा उद्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष आम्ही देवु त्यासाठी नेते म्हणुन न राहता, गावागावात जावुन काम केले पाहीजे. नेतेगिरी करुन यश मिळणार नाही. मंत्री उदय सामंत संघटना वाढीसाठी दिवसरात्र काम करत आहेत. आपल्याला संघटना बांधण्यासाठी काम केले पाहीजे. तिकडचे दोन मतदार संघ आमदार म्हणुन आम्ही सांभाळु. कणकवली मतदार संघ आम्ही सर्वजण सांभाळायला तयार आहेत. आपल्याला कुठेही कमी समजु नका. माझे कोण काय करु शकतं.. ही भावना ठेवा ही शिवसेना स्टाईल आहे. मी कणकवलीत वाढलेलो आहे. आपल्याला निवडणुका जिंकण्यासाठी काम केले पाहीजे. माझ्या अस्तित्वाची लढाई म्हणुन काम केले पाहीजे. उद्याची नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या मतदार संघामध्ये शिवसेनेची ताकद दाखवायची म्हणजे दाखवायची.
या मेळाव्यात नांदगाव उपसरपंच निरज मोरये यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या मेळाव्यात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन संदेश पटेल यांनी केले.