नांदगाव माजी उपसरपंच निरज मोरये यांच्यासह कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत

कणकवली दि.३० ऑक्टोंबर

कणकवली तालुक्यातील नांदगाव माजी उपसरपंच व भाजपाचे कार्यकर्ते निरज मोरये यांचा मंत्री उदय सामंत तसेच आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत नांदगाव ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये तसेच इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी सिद्धेश मोरये, रामचंद्र मोरये, निलेश मोरये यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेत्यांनी प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांना शाल घालत शिवसेनेचा भगवा झेंडा हातात देवुन स्वागत केले.
माजी आ. राजन तेली, उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख संजय परब, उपजिल्हाप्रमुख संदेश पटेल, हरेष पाटील, तालुकाप्रमुख दामोदर सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.