गडचिरोलीत भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भीती

गडचिरोली,ता.१

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी रस्त्यावर केलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त होते आहे कुरखेड्यापासून सुमारे ६ किमी अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ हा भूसुरुंगस्फोट झाला असून यामुळे परिसरात आता दहशतीचे वातावरण पसरले आहे

सीआरपीएफच्या क्वीक रिस्पॉन्स टीममधील जवान खासगी वाहनाने जात असताना अचानक नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत.नक्षलींना चकवण्यासाठी १५ जवान आणि ४ जण २ खासगी गाड्यांनी जात होते. मात्र नक्षलींना याविषयी कुणकुण लागल्यामुळे त्यांनी हा हल्ला घडवल्याची शक्यता वर्तवली जात आहे

Sindhudurg24taas युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा