हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

वेंगुर्ला,दि.१८ एप्रिल

वेंगुर्ला-मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिरात दि. १९ ते २३ एप्रिल या कालावधीत सार्वजनिक हनुमान जयंतीचे आयोजन केले आहे. यानिमित्त दि.१९ रोजी सायं.७ वा.वावळेश्वर द.ना.मंडळाचे ‘पंचमुखी हनुमान‘ हे नाटक, दि.२० रोजी सायं.७ वा.दत्त माऊली द.ना.मंडळाचे ‘मिनाक्षी सुंदरेश्वर‘ हे नाटक, दि. २१ रोजी सायं.७ वा. रामेश्वर द.ना.मंडळाचे ‘हर्षदा पुनर्जन्म‘ हे नाटक, दि.२२ रोजी श्री सातेरी तरूण द.ना.मंडळाचे ‘रामभक्त जांबुवंत‘ हे नाटक होणार आहे. दि.२३ रोजी पहाटे ४.३० वा. मारुतीची पूजा व अभिषेक, पहाटे ५ वा.ह.भ.प.डॉ.रमेश पाटकर यांचे सुश्राव्य किर्तन, ६ वा. श्री हनुमान जन्मोत्सव, पुष्पवृष्टी, आरती व तीर्थप्रसाद, सायं.५ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, सायं.७ वा.आजगांवकर द.ना.मंडळाचे ‘लवकुश‘ हे नाटक होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर सेवा न्यासतर्फे केले आहे.